मुख्य पान

प्रिय बापट बंधू-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,

    २३ डिसेंबर २००७ च्या चित्पावन संमेलनात आपण जवळ जवळ हजारजण भेटलो होतो. त्या वेळी त्या भेटीचा झालेला आनंद आपणा सर्वांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. पुण्यातील आपल्या काही बापट मंडळींनी सर्वांपर्यंत संमेलनाची माहिती पोहोचवण्यासाठी खूप कष्ट घेतले. ते सविस्तर सांगत नाही. आपण सारे एकत्र जमलो यातच ते भरून पावले. तो सोहळा संपताना सगळ्यांनाच विरहाची हुरहूर जाणवली. सगळेजण 'पुन्हा भेटूया हा नक्की!' असं म्हणत जड अंतःकरणाने एकमेकांचा निरोप घेत होते. खरं तर तिथली उपस्थिती म्हणजे समुद्रातल्या बर्फकड्याचं केवळ शिखर होतं. खुपच बापट मंडळी अजून अपरिचित होती. हा परस्पर भेटीचा आनंद सर्वांना का मिळू नये? या विचारातून ' बापट परिवार चॅरिबल ट्रस्ट' ची कल्पना प्रा. गौतम बापट यांनी पुढे आणली आणि स्थापना प्रक्रिया सुरु केली.

एक एक शोधावा I स्नेहरज्जूने गुंफावा I
परिवार संपन्न करावा I बापटकुलाचा II

    या भावनेने बापट मंडळी शोधणं, त्यांची जोडणी करणं हे काम सुरु झालं - ते अजूनही संपलेलं नाही. सर्वच बापट मंडळींची ट्रस्टकडे नोंद होणं, त्यांचे पत्ते, फोन नंबर एकत्रित होणं हे महत्वाचं काम आपणा सर्वांना करायचं आहे. यासाठी बापट परिवार "संपर्क सेतू" हे महत्वपूर्ण काम ट्रस्टनी हातात घेतलेले आहे...

जो जो आपणास भेटला I तो तो परिवारात गुंफला I
परिवार समृद्ध केला I आपलाची IIबापट कुलसम्मेलन २०१८


१८ डिसेंबर २०१६ रोजी, जामसंडे (देवगड) येथे पार पडलेल्या "७व्या बापट कुलसम्मेलनात" २०१८ चे "८वे बापट कुलसम्मेलन" हे चिपळूण परिसरात घेण्याचे नक्की झालेले आहे. अधिक माहिती लवकरच...

विनंती

हे संकेतस्थळ अजून डेव्हलप होत आहे. आपल्या सूचना अभिप्राय या सेक्शन मधून जरूर कळवाव्यात. धन्यवाद !
- प्रा. गौतम बापट