बापट कुलसम्मेलन (प्रस्तावित)

केळ्ये - रत्नागिरी

नमस्कार,

नोव्हेंबर २०१८ ला खडपोली (चिपळूण) येथे पार पडलेल्या "९व्या बापट कुलसम्मेलनात", "१०व्या बापट कुलसम्मेलनाची" मुहूर्तमेढ रोवली गेली ! पुण्याच्या वतीने श्री. नरसिंह बापट, औंध (सातारा) कडून श्री. मकरंद बापट आणि केळ्ये - रत्नागिरीतर्फे डॉ. गिरीश बापट अश्या तीन ठिकाणाहून २०२० च्या कुलसम्मेलनाच्या आयोजनाबद्दल प्रस्ताव आले. त्यावर बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे काही विश्वस्त, काही इतर उपस्थित यांची साधक बाधक चर्चा होऊन "१०वे बापट कुलसम्मेलन" केळ्ये - रत्नागिरी येथे घेण्याचे सुनिश्चित झाले ! डॉ. गिरीश बापट यांनी "१०वे बापट कुलसम्मेलन" केळ्ये - रत्नागिरी येथे घेण्याचे श्रीफळ रत्नागिरीकर बापट मंडळींच्या वतीने स्वीकारले.

कोरोनाच्या सद्य परिस्थितीमुळे प्रस्तावित १० वे कुलसंमेलन व त्याबाबतची माहिती लवकरच कळवण्यात येईल...

संमेलनाचे प्रस्तावित स्थळ

श्रीरामकृष्ण आनंदवन रिसॉर्ट

केळ्ये (अम्बेकंद) येथे, माझगाव, ता. जिल्हा. रत्नागिरी, महाराष्ट्र पिन कोड नं .1515612 :: मोबाईल : 98200 23106 :: ई-मेल : shreeramkrishnatravels@gmail.com :: वेब साईट : http://shreeramkrishnaanandvan.com/