आम्ही सारे बापट

आम्ही सारे बापट, आम्ही सारे बापट
होऊ आम्ही बळकट, होऊ आम्ही दणकट

        इच्छा आमुची देशसेवेची
        इच्छा आमुची परोपकाराची
        इच्छा आमुची लढण्याची
        न्यायाची अन् बलिदानाची

आज आम्ही करितो प्रकट ll१ll

        दोडी लागता आध्यात्माची
        पुण्यशील त्या के भिंची
        अन् त्यांच्या उपदेशाची
        पावन झाली जनता चिपळूणची

म्हणून आमुचे प्रेम तयांवर उत्कट ll२ll

        साथ लाभता थोर शूर सेनापतींची
        मुक्त झाली भूमी मुळशीची
        मिळे कसण्यास जमीन हक्काची
        तहान भूक भागली जनतेची

परी लढा तयांचा नाही गेला फुकट ll३ll
        थोर परंपरा ती स्वातंत्रवीरांची
        विरश्रीयुक्त पुण्य जीवनाची
        नसे भीती कोणत्याही कष्टांची
        खाऊ आम्ही भाकरी मेह्नितीची

परी नाही कधी करणार आम्ही कपट ll४ll

        चालू आता वाट उन्नतीची
        देऊया ग्वाही निष्कलंक चारित्र्याची
        मार्गक्रमणा असे जरी परिश्रमाची
        जपूया नाती आपण विश्वबंधुत्वाची

दाखवू येथेची आपली ताकद खरी ll५ll

        आतुरता आम्हास आहे न्यानार्जनाची
        आस लागली आम्हा आमुच्या प्रगतीची
        आठव ठेऊ गतादिवसांची अन् पूर्वजांची
        उंच वाढवू कमान या भारताची

काळाच्याही खुणा करू पुसट आम्ही ll६ll

मंगेश  दत्तात्रय बापट
चिपळूण
मोबाईल : ९४२२०५३४२२
अपलोड केल्याची तारीख : २ ऑक्टोबर २०१२
स्नेहबंध २००९ च्या अंकात प्रसिद्ध
Comments