४. प्रतिनिधी मेळाव्यांचे अहवाल

प्रतिनिधी सभा अहवाल
१४ जून २०१५

दिनांक १४ जून २९१५ रोजी, बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण प्रतिनिधी सभा “प्रशांत सभागृह, पुणे” येथे पार पडली. या सभेला साधारणपणे ५० बापट प्रतिनिधी उपस्थित होते. आतिशय उत्साही वातावरणात ही सभा झाली. सभेत पुणे, मुंबई, इंदोर, चिपळूण, ठाणे अश्या अनेक शहरांतून उपस्थिती होती. या सभेत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यातील काही ठळक मुद्दे आणि सर्वानुमते संमत झालेले काही महत्वाचे निर्णय खालीलप्रमाणे :

१. बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टची आर्थिक घडी अजून बळकट करण्यासाठी सर्व बापट कुटुंबियांनी आपापल्या कुटुंबात साजरे केले जाणारे वाढदिवस आणि विशेष दिवसांनिमित्त ट्रस्टला यथाशक्ती मदत दरवर्षी करावी.
२. वरिल कामाचे स्वरूप मोठे असल्यामुळे या कामासाठी “दिनविशेष प्रतिनिधी” नेमण्याचा विचार पुढे आला आहे. या प्रतिनिधीने त्याच्याजवळ दिलेल्या डेटाबेस नुसार रोज सकाळी केवळ एक फोन करून शुभेच्छा देऊन देणगीचे आवाहन करावयाचे आहे. तरी कृपया दिनविशेष प्रतिनिधी म्हणून ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी ट्रस्टशी संपर्क साधावा.
३. बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एक वर्षाआड आयोजित केल्या जाण्याऱ्या “बापट कुलसम्मेलनात” आता केवळ १० पुरस्कार देले जातील. त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे :
a. पुरस्कार क्रमांक १ : गेल्या वर्षासाठीचा “बापट कुलरत्न” पुरस्कार.
b. पुरस्कार क्रमांक २ : चालू वर्षासाठीचा “बापट कुलरत्न” पुरस्कार.
c. पुरस्कार क्रमांक ३ ते १० : सामाजिक, कला, वैद्यकशास्त्र, शिक्षण इत्यादी क्षेत्रात श्रेष्ठ कार्य केलेल्या स्थानिक समाज रत्नांचा पुरस्कार. या पुरस्कारासाठी पुरस्कारार्थीचे बापट कुलोत्पन्न असणे बंधनकारक नाही.
४. पुरस्कार क्रमांक १ आणि २ चे पुरस्कारार्थी बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट कडून नक्की केले जातील. परंतु पुरस्कार क्रमांक ३ ते १० चे पुरस्कारार्थी ठरविण्याची जबाबदारी स्थानिक संयोजन समितीकडे राहील.
५. पुरस्कार क्रमांक १ आणि २ म्हणजेच “बापट कुलरत्न” पुरस्काराचे उच्च स्थान पाहता, यात कोणतीही धनराशी दिली जाणार नाही. पुरस्कार क्रमांक ३ ते १० साठी मात्र एक ठराविक धनराशी दिली जाईल.
६. पुरस्कार क्रमांक ३ ते १० हे आठ पुरस्कार आता प्रायोजित पुरस्कार असणार आहेत. यासाठी प्रायोजकाकडून एका पुरस्कारासाठी रुपये १५,०००/- मात्र घेऊन ट्रस्ट या रकमेची ठेव बँकेत ठेवेल. त्यावरील व्याजातून तीन वर्ष हा पुरस्कार दिला जाईल. तीन वर्षानंतर ही ठेव संस्थेकडे जमा होईल व पुरस्कार बंद होईल.
७. पुरस्कार प्रायोजक केवळ पुरस्काराचे नाव ठरवू शकेल, परंतु पुरस्कार कोणाला द्यायचा हे मात्र त्याला ठरवता येणार नाही. तीन वर्षाच्या काळात साधारणपणे २ किंवा ३ कुलसम्मेलने होतात. कमी अथवा जास्त झाली तरी पुरस्कार प्रायोजक कोणताही आक्षेप घेऊ शकणार नाही.
८. ट्रस्टचा प्रचार आणि कार्याचा प्रसार होण्यासाठी पाहिल्या फेज मध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात प्रत्येकी दोन प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. तरी सर्व बापट कुलोत्पन्नांनी याची दाखल घेऊन पुढाकार घ्यावा.
टीप : हा लेख एक माहिती असून संस्थेच्या मिनिट बुकाशी सलग्न नाही.

प्रतिनिधी सभा अहवाल
१९ जून २०१६

दिनांक १९ जून २९१६ रोजी, बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण प्रतिनिधी सभा “भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे” येथे पार पडेल.
Comments