बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट
आपल्या सर्वांच्या सहयोगाने, विश्वासाने आणि जेष्ठांच्या आशीर्वादाने बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टने दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ रोजी सेवेची १० दिमाखदार वर्ष पूर्ण केली !
आपल्या दिवंगत संस्थापकीय अध्यक्षा विद्याताई बापट, संस्थेचे सर्व आजी-माजी विश्वस्त आणि समस्त बापट बंधू भगिनींचे या प्रसंगी खूप मनापासून आभार !
बापट कुलसम्मेलन २०२२ : विष्णुकृपा हॉल, पुणे
रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२
सर्व बापट कुलबंधू,भगिनी आणि माहेरवाशिणींना नमस्कार…
कळविण्यास आनंद होत आहे की आपण आपले १० वे कुलसम्मेलन रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी, विष्णुकृपा हॉल, शनिवार पेठ, पुणे ४११०३० या ठिकाणी आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. सदर संमेलनात बापटकुलातील माहेरवाशिणींनाही सहभागी करावयाचे आहे. त्यांच्यापर्यंत आम्ही वैयक्तिक पोहचू शकत नसल्याने प्रत्येक कुटुंब प्रमुखाने माहेरवाशिणींना आमच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देऊन सर्व कार्यक्रमांत सहभागी करुन घ्यावे, ही विनंती. संमेलनाची वेळ सकाळी ९.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत असेल. दिनांक ११ डिसेंबर रविवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. त्यादिवशी साधारण पणे बऱ्याच मंडळींचा उपवास असतो त्यामुळे आपण भोजन व न्याहरी मध्ये उपवासाचे, फराळाचे तसेच ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी सर्वसाधारण पदार्थांचे नियोजन करत आहोत. त्यासाठी रजिस्ट्रेशन करताना आपला उपवास आहे किंवा नाही हे नमूद करावे ही विनंती. तसेच आपल्या कुलसंमेलनामध्ये आपण एक नाट्यसंगीताचा बहारदार कार्यक्रम आयोजित करीत आहोत, सदर कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता हॉल वरच असणार आहे, कार्यक्रम संपल्या वर स्नेहभोजन आयोजित केलेले आहे..
संमेलन शुल्क प्रति व्यक्ती रु.५००/- ठरविण्यात आले आहे. १० वर्ष वयोगटापर्यंत संमेलन निःशुल्क असेल, मात्र १० वर्षावरील प्रत्येकास संपूर्ण शुल्क द्यावे लागेल. जास्तीत जास्त बापट कुटुंबियांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा या उद्देशाने शुल्क कमीत कमी ठेवले आहे. रु.५००/- मध्ये रविवार सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा व रात्रीचे जेवण समाविष्ट आहे. ज्यांना हॉटेल / लॉज ची व्यवस्था हवी असेल त्यांना ती स्वखर्चाने करावी लागेल. एकदा शुल्क भरल्यानंतर कोणत्याही कारणास्तव शुल्क परत दिले जाणार नाही. इच्छुकांनी संमेलन शुल्क लवकरात लवकर भरावे, जेणेकरुन आयोजकांना पुढील नियोजन करणे सोपे होईल ही नम्र विनंती.
त्याचप्रमाणे, या सम्मेलनाप्रीत्यर्थ कोणाला आपल्या ट्रस्टला देणगी द्यायची असेल तर ती ही सोय केली आहे.
आपले विनीत,
विश्वस्त मंडळ
● अध्यक्ष ● विनायक के. बापट ९८२२०२८२९०
● उपाध्यक्ष ● डॉ. गौतम सु. बापट ९७६६५८७५५१
● सचिव ● विनायक मा. बापट ९४२२५०९१२९
● खजिनदार ● राहुल मो. बापट ७७७६९१५३३०
● सदस्य ● श्रीकांत के. बापट ९४२१२३२५०१
● सदस्य ● सुधीर अ. बापट ९८९००६५३८५
● सदस्य ● शरद म. बापट ८००७५९३९००
● सदस्य ● देवव्रत श्या. बापट ९८२२०१२७२१
● सदस्य ● निमिष वि. बापट ९४२०६०६०३८
प्रिय बापट बंधू-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,
२३ डिसेंबर २००७ च्या चित्पावन संमेलनात आपण जवळ जवळ हजारजण भेटलो होतो. त्या वेळी त्या भेटीचा झालेला आनंद आपणा सर्वांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. पुण्यातील आपल्या काही बापट मंडळींनी सर्वांपर्यंत संमेलनाची माहिती पोहोचवण्यासाठी खूप कष्ट घेतले. ते सविस्तर सांगत नाही. आपण सारे एकत्र जमलो यातच ते भरून पावले. तो सोहळा संपताना सगळ्यांनाच विरहाची हुरहूर जाणवली. सगळेजण 'पुन्हा भेटूया हा नक्की!' असं म्हणत जड अंतःकरणाने एकमेकांचा निरोप घेत होते. खरं तर तिथली उपस्थिती म्हणजे समुद्रातल्या बर्फकड्याचं केवळ शिखर होतं. खुपच बापट मंडळी अजून अपरिचित होती. हा परस्पर भेटीचा आनंद सर्वांना का मिळू नये? या विचारातून ' बापट परिवार चॅरिबल ट्रस्ट' ची कल्पना प्रा. गौतम बापट यांनी पुढे आणली आणि स्थापना प्रक्रिया सुरु केली.
एक एक शोधावा I स्नेहरज्जूने गुंफावा I
परिवार संपन्न करावा I बापटकुलाचा II
या भावनेने बापट मंडळी शोधणं, त्यांची जोडणी करणं हे काम सुरु झालं - ते अजूनही संपलेलं नाही. सर्वच बापट मंडळींची ट्रस्टकडे नोंद होणं, त्यांचे पत्ते, फोन नंबर एकत्रित होणं हे महत्वाचं काम आपणा सर्वांना करायचं आहे. यासाठी बापट परिवार "संपर्क सेतू" हे महत्वपूर्ण काम ट्रस्टनी हातात घेतलेले आहे...
जो जो आपणास भेटला I तो तो परिवारात गुंफला I
परिवार समृद्ध केला I आपलाची II