ना. गिरीशभाऊ बापट यांचा हृद्य सत्कार

पुणे:- बापट परिवारातील कुलरत्न नामदार व पुणे येथील कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री. गिरीशभाऊ बापट हे कॅबीनेट मंत्री झाल्याबद्दल त्यांचा बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे तर्फे नुकताच पुणे येथे सौ. ज्योतीताई बापट यांच्या घरी मयूर कॉंलनी, कोथरूड येथे पारिवारिक पण अतिशय हृद्य असा सत्कार करण्यात आला. याच वेळी मा. गिरीशभाऊ बापट यांच्या पत्नी सौ. गिरिजाताई बापट यांचा देखील सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम सौ. श्यामालाताई बापट यांनी सर्व उपस्थितांचे तसेच सत्कारमूर्ती श्री. गिरीशभाऊ बापट व त्यांच्या पत्नी सौ. गिरिजाताई बापट यांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती. विद्याताई बापट यांनी हा घरगुती कौतुक सोहळा असून आम्ही तो गिरीशभाऊंच्या व्यस्त वेळापत्रकामुळे उशिरा आयोजित केला आहे असे नमूद केले. या कार्यक्रमासाठी ठाणे,पुणे,मुंबई,बेळगाव,चिपळूण आदी ठिकाणांहून सुमारे १०० बापट बंधु-भगिनी उपस्थित होते. नुकतेच २५ जानेवारी २०१५ ला बेळगाव येथे झालेल्या बापट कुलसम्मेलनाची माहिती बेळगावच्या श्री. मिलिंद बापट व श्री. महादेव बापट यांनी उपस्थितांना दिली आणि गिरीशभाऊंचा सत्कार केला. चिपळूणहून श्री.श्रीकान्त बापट, श्री.प्रबोध बापट,श्री.मंगेश बापट,श्री.उदय बापट, कु. चिन्मयी बापट यावेळी उपस्थित होते. बापट मंडळ चिपळूणतर्फेही ना. गिरीशभाऊंचा सत्कार श्री. मंगेश बापट यांनी केला तर श्री.श्रीकान्त बापट यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच चिपळूणला पूर्ण एक दिवस आपण यावे अशी विनंतीही गिरीशभाऊंना करण्यात आली.

सत्काराला उत्तर देताना नामदार गिरीशभाऊंनी हा माझा घराने केलेला सत्कार असल्याने मी खूप भारावून गेलो असून आपणासर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळे मी आज महाराष्ट्राचा मंत्री आहे म्हणून आपणासर्वांचा मी ऋणी आहे असे सांगितले. बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टसाठी आणि ट्रस्टतर्फे चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी मी बापट म्हणून कधीही मदतीचा हात द्यायला तयार आहे असेहि आवर्जून सांगितले.नामदार गिरीशभाऊंनी मार्गदर्शन करताना पुढे असे सांगितलेकी माझ्याप्रमाणेच जास्तीतजास्त बापट बंधु-भगिनीनी तसेच समाजातील सर्व घटकांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्यावे आणि मन लावून काम करावे कारण आज ती काळाची गरज आहे. सुमारे दोन तास रंगलेल्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते...

ना. गिरीश भाऊ उपस्थितांना संबोधित करताना

ना. गिरीश भाऊंचा पुष्पहाराने सत्कार करताना