नमस्कार...
२००८ साली स्थापन झालेल्या बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टला, पाहाता पाहाता १७ वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. या काळात ट्रस्टने अनेक भूषणावह कामं केलेली आहेत. सामाजिक बांधिलकी व सर्व बापट कुलनामधारकांचे एकत्रीकरण ही विचारप्रणाली प्रमाण मानून आपली वाटचाल झालेली आहे. समाजोपयोगी कामांमधे आपण अग्रेसर राहिलो. जात, धर्म न पाहाता अनेक विद्यार्थाना मदतीचा हात दिला. पूर, वादळ यासारख्या अस्मानी संकटांमधे अनेक शहरात प्रत्यक्ष जाऊन मदत दिली. रक्तदान शिबिरे घेतली, रुग्णांना मदतीचा हात दिला.
अनेक नवनवीन उपक्रम करण्यात सुध्दा आपण सतत आघाडीवर राहिलो आहोत. चिपळूण, पुणे, खडपोली अशा अनेक ठिकाणी आपण अनेक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. यासोबतच सर्व बापट कुलनामधारकाना एकत्र आणण्याचा कार्यक्रम म्हणजे आपले नियमितपणे होणारे द्वैवार्षिक संमेलन व काही वेळा एक वर्षाने होणारेही संमेलन!!
याआधीचे आपले ११वे कुलसंमेलन २३ व २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी केळ्ये, रत्नागिरी येथे झाले होते ते आनंदवन रिसॉटमधे!
आता १ वर्षातच आपण संमेलनाच्या माध्यमातून परत एकदा भेटतो आहोत. रविवार दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी आपले १२वे बापट कुलसंमेलन औंध संस्थान, जि. सातारा येथे होणार आहे. या एक दिवसाच्या संमेलनाचे शुल्क फक्त ₹५००/- (रुपये पाचशे मात्र) प्रतिव्यक्ती, एवढेच, ठेवण्यात आले आहे. सर्व बापट कुलबंधूभगिनी तसेच बापटांच्या माहेरवाशिणी यांनाही या संमेलनास अवश्य येण्याचे आवाहन करीत आहोत.
याही संमेलनात आपले नेहमीचे कार्यक्रम होतीलच! त्याचबरोबर यावर्षी प्रथमच आपण गणेशोत्सव आरास स्पर्धेचे यशस्वी आयोजन केलेले होते. यातील विजेत्यांच्या पारितोषिक वितरणाचा सोहळाही आपण या संमेलनात करणार आहोत. संमेलनाचे शुल्क रुपये ५००/- (प्रति माणशी) खूपच आधी आणि तेही ऑनलाईन भरण्याची सुविधाही आपण उपलब्ध करून देत आहोत.
१२वे एकदिवसीय बापट कुलसंमेलन २०२५
स्थळ : औंध, जिल्हा सातारा
कार्यक्रमाचे वेळापत्रक
🕣 सकाळी ८:३० ते ९:३० — नाश्ता - स्थळ : बापट वाडा
🕤 सकाळी ९:३० ते १०:३० — औंध आर्ट गॅलरी व गावातील यमाई देवी मंदिर भेट
🕥 सकाळी १०:३० ते ११:०० — नोंदणी (Registration) - स्थळ : साई मंगल कार्यालय, औंध
🕚 सकाळी ११:०० ते दुपारी २:०० — ट्रस्ट आयोजित मुख्य कार्यक्रम
🕑 दुपारी २:०० ते ३:०० — भोजन
🕒 दुपारी ३:०० नंतर — डोंगरावरील यमाई मंदिर व संग्रहालय (म्युझियम) दर्शन
🕕 सायं. ६:०० — समारोप व चहापान - स्थळ : म्युझियम आवारातील परिश्री कॅन्टीन
चला तर एकच संकल्प करूया !
२१ डिसेंबर २०२५ रविवार, चलो औंध, सातारा!!
सन्मानिका घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !
अधिक माहितीसाठी संमेलनाचे निमंत्रक श्री. मकरंद बापट यांना +91 98440 59567 या क्रमांकावर संपर्क साधावा.