सेनापती

पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट (नोव्हेंबर १२, इ.स. १८८० - नोव्हेंबर २८, इ.स. १९६७)

हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते.

जन्म व शिक्षण

त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी. ए. पर्यतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. बी.ए. परीक्षेत इ.स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुबंई विद्यापिठाची शिष्यतृत्ती मिळवुन त इंग्लंडला गेले एडिंबरो येथे इंजिनिअरिंग कॉलेज घेतला.

कार्य

सेनापती बापटांनी लंडन येथील वास्तव्यामध्ये बाँब बनवण्याची कला हस्तगत केली. असे असले तरी हि "माझ्या बाँबमुळे एकही बळी गेला नाही". ते फक्त आमच्या कार्याकडे ल़क्ष वेधण्यास केले गेले होते" असे त्याचे म्हणणे होते. मात्र तरीही त्याना अलिपुर बाँब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्याव‍र आरोप होता. इ.स. १९२१ पर्यत स्वत:च्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि समाजसेवा व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर स्वीकारले.

इ.स. १९२१ ते इ.स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकर्‍यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले या आंदोलनात कारागृहावासाची तीनदा शिक्षा त्यांना झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. संस्थाची प्रजांच्या हक्कांकरिता चालु असलेल्या आंदोलनात भाग घेऊन संस्थानच्या प्रवेशबंद्या त्यांनी मोडल्या त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन गोवामुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इ. आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

गौरव

पुण्यातील १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ साली ध्वजारोहण सेनापती बापटांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील सार्वजनिक रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

मुळशी धरणग्रस्तांचे कैवारी

सेनापती बापट

मी प्रत्यक्ष तात्यांना पहिला नाही. हे माझे दुर्भाग्य. परंतु काही दैवी पुरुषाच्या वस्तूच्या स्पर्शाने सुद्धा प्रचंड प्रेरणा कशी मिळते हे माझ्या बाबतीत घडले. मुळशीधरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तात्यांनी १९२१ मध्ये १६ एप्रिलला जगातील पहिला – धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लढा लढविला व पांडुरंग महादेव बापट ‘सेनापती’ झाले. हा मुळशी करांचा सन्मान आहे.

तात्यांचा जन्मशताब्दी वर्ष म्हणजे मुळशीकरांच्या दृष्टीने ‘सुवर्ण योग’ ठरला. तात्यांनी सत्याग्रह विकासासाठी केला होता. परंतु स्वत्रांत्यानंतर ४० वर्षे आणि सत्याग्रहानंतर ६० वर्षे हा भाग अंधारात होता. त्याचवेळी तात्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे कौतुक शासन दरबारी मोठे चालले होते. पण सेनापती बापट यांचा स्वर्गस्थ आत्मा मात्र शासनाचे हे कौतुक पाहताना तडफडत होता. म्हणूनच त्यंच्या स्वर्गीय प्रेरणेने विकासाचे दालन खुले झाले. विजेसाठी धरण होऊनही धरणग्रस्त भागात विजेचा दिवा पेटला नव्हता. परंतु सेनापती बापट यांचे चहाते स्व. जयंतराव टिळक, प्रा.ग.प्र. प्रधान यांनी ‘माले’ येथे खास बाब म्हणून तात्यांच्या नावाने विद्यालय सुरु केले. तर स्वातंत्र्य प्रेमाचा संदेश देणारा ‘सेनापती बापट स्मारक स्तंभ’ खुद्द टाटा पॉवर कंपनीने उभारला. आज या शाळेत ५०० विद्यार्थी शिकतात. शासन व टाटांच्या आर्थिक मदतीतून ‘आय टी आय’ ही सुरु करीत आहे. तात्यांनी टाटा यांच्या विरुद्ध केलेला लढा हा ‘मावळ-वासीयांना ब्रिटीश शासना विरुद्ध संघटीत करण्याचा प्रयत्न होता. स्वातंत्र्य लढ्यातील तात्यांच्या योगदानाचा आदर करून खुद्द टाटा कंपनी स्मारकाची काळाज घेते. टाटांचे वरिष्ठ अधिकारी आवर्जून तात्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी जयंती-पुण्यतिथी दिनी उपस्थित राहतात. शाळेतही जमशेटजी व जे. आरडी यांना अभिवाद करण्यात येते. हि सर्व तात्यांची पुण्यायीच आहे. माझ्यासारख्या मुळशी धारण ग्रस्तांच्या तिसऱ्या पिढीच्या वर्षात तात्यांच्या प्रेरणेने या भागात सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळणे हि तात्यांची कृपा.

माझ्या घरातील माझ्या व्यतिरिक्त सार्वजन ‘अंगठेबहाद्दर’! परंतु माझ्या आईच्या दूरदृष्टीने मी ज्या अडचणीतून शिक्षण घेतले ती अडचण इतरांवर येऊ नये, आईचा प्रेमळ आशीर्वाद आणि स्वगीय तात्यांची प्रेरणा हाच माझा प्रेरणा स्त्रोत ! गेली ३० वर्षे ‘तात्यांची’ जयंती / पुण्यतिथी निमित्ताने तात्यांची ‘स्मृती’ जतन करण्याचे काम कृतज्ञतेपोटी करीत आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना सतत तात्यांचे अस्तित्व जाणवत असते. माझ्या सारख्या बहुजन समाजातील तळातील माणसाकडून तात्यांच्या प्रेमापोटी झालेली छोटीशी सेवा तात्यांच्या चरणी समर्पित करतो.

महाराष्ट्रातील ‘बापट’ परिवार हा शाळा व संस्था यांचा झाला आहे. टाटा पॉवर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष उल्हास बापट, सेनापती बापट येनचे सुपुत्र कै. वामनराव बापट तसेच बापट कुळाचे अत्यंत घडाडीने काम करणाऱ्या विद्याताई बापट येनचे प्रेम हे सेनापतींचे आशीर्वाद मानतो.

- श्री. रामचंद्र दातीर

संस्थापक – सेनापती बापट प्रशाला

(माले मुळशी) जि. पुणे.

अपलोड केल्याची तारीख : १२ ऑक्टोबर २०१२

स्नेहबंध २००९ च्या अंकात प्रसिद्ध