बापट कुलसम्मेलन २४ - २५ नोव्हेंबर २०१८ : खडपोली

बापट परिवार चॅरीटेबल ट्रस्ट,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली,बापट मंडळ खडपोली चिपळूण यांच्या तर्फे यंदा दि. २४ व २५ नोव्हेंबर २०१८(शनिवार-रविवार) रोजी बापट कुलसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी या संमेलनात विविध कार्यक्रमांची मांदियाळी असून या संमेलनाची पूर्वतयारी बापट मंडळ चिपळूण तर्फे उत्साहाने सुरु आहे. हे संमेलन २४ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी होणाऱ्या आरोग्य शिबिराने खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. यातील पहिले उद्घाटनाचे सत्र दुपारी ३ नंतर संपन्न होईल.या संमेलनात सहभागी होणाऱ्या बापट बंधू-भगिनींची सोय या संमेलनात अगत्याने करण्यात येणार आहे.ज्यांना कॉमन हॉलमध्ये राहण्यची व झोपण्याची सोय चालणार आहे त्यांची विनाशुल्क सोय होणार असून तेथे रात्री झोपण्यासाठी गादी,उशी,बेडशीट देण्यात येईल. दि. २५ रोजी सकाळी चहा,अंघोळीसाठी गरम पाणी याची सोय करण्यात येणार आहे. बाथरूम (कमोडसह) उपलब्ध आहेत.याशिवाय ज्यांना ही व्यवस्था स्वतंत्रपणे हवी असेल त्यांना कार्यक्रम स्थळापासून सुमारे २ कि.मि. वर असणाऱ्या लॉजमध्ये ही सोय सशुल्क करण्यात येईल. याशिवाय खेर्डी व चिपळूण येथेही लॉजेसची व्यवस्था सशुल्क करण्यात येईल.याच तारखांना चिपळूणमध्ये चितळे कुलसंमेलन असल्याने चिपळुणातील लॉजेसमध्ये व्यवस्था करावयची असेल तर ३० सप्टेंबर २०१८ चे आत बुकिंग करावे लागेल. तसेच कॉमन राहण्याची सोय पहिल्या काळविणाऱ्या १०० माणसांचीच होईल.यासाठी इच्छुकांनी सजग राहून वेळीच आपली सोय नक्की करावी.निवास व्यवस्थेसाठी चिपळुणातील काही लॉजेसचे नंबर योग्यवेळी कळविण्यात येतील.

संमेलनस्थळाची जागा चिपळूण शहरापासून सुमारे १० कि.मी.वर असण्याऱ्या खडपोली या गावी असून हे गाव चिपळूण-कराड मार्गावर पेढांबे ब्रीज या थांब्यापासून सुमारे १ कि.मि अंतरावर आहे. पुणे किंवा कराड रोडने चिपळूणला येताना कुंभार्ली घाट उतरल्यानंतर पोफळी-शिरगाव-अलोरे-पेढांबे ब्रिज असा मार्ग आहे.चिपळूण कडून येणाऱ्या वाहनांसाठी चिपळूण-खेर्डी-पिंपळी-पेढांबे ब्रिज असा मार्ग आहे.याच संमेलनात एक संग्राह्य अशी स्मरणिका ही काढण्यात येणार असून त्यासाठी जाहिराती पाठविण्याची अंतिम मुदत दि. ३१ ऑगस्ट २०१८ ही आहे.

आपल्याकडे उपलब्ध असलेल्या बापट कुलबांधवांपर्यंत संमेलनविषयाची माहिती आपण पोहोचवावी व जास्तित जास्त कुलबांधव उपस्थित राहतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन संमेलन संयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

विशेष सुचना:- आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता संमेलनासाठीची देणगी तसेच स्मरणिका जाहिरात शुल्क देण्यासाठी केवळ अकाउंट पेई चेकच “ बापट परिवार चॅरीटेबल ट्रस्ट,पुणे” या नावानेच द्यावा वा तो पुणे येथे ट्रस्टचे कार्यालयात किंवा चिपळूण येथे आनंद (नंदू) बापट,चिपळूण यांचे पत्यावर देण्यात यावा.

संमेलनाविषयी अधिक माहिती हवी असल्यास खालील व्यक्तींशी संपर्क करावा.

१) श्री. आनंद(नंदू) जनार्दन बापट - ९०१११९७५८३

२) श्री.श्रीकान्त (भाऊ) बापट - ९४२१२३२५०१/०२३५५-२७४००१

३) श्री.मंगेश बापट - ९४२२००३४२२/९४२२०५३४२२

४) श्री.प्रबोध बापट - ९४२२२४३३३३१

बापट ट्रस्टने केलेल्या आर्थिक मदतीचा तपशील

२००९ ते २०११

१) निवारा वृद्धाश्रम व आपले घर वृद्धाश्रम (पुणे) यांना धान्यरूपाने मदत

२) दापोली येथील श्रीमती लक्ष्मीबाई देर्देकर यांना वादळात घर पडल्याने घराच्या पुनर्बांधणीसाठी मदत रु.१०,०००/-

३) आशुतोष रत्नपारखे,जळगाव याला वार्षिक शुल्क भरण्यासाठी मदत रु.२०,०००/-

४) कु.श्रद्धा बापट हिला अंतिम वर्ष MBBS चे शुल्क भरण्यासाठी मदत द्वारा श्री.संजय बापट रु. २५,०००/- + ट्रस्टच्या प्रयत्नातून दिलेली मदत रु.१,५०,०००/-

५) रक्तदान व नेत्रदानाची संकल्प पत्रे भरून घेऊन योग्य त्या अधिकाऱ्यांकडे सादर

२०११ ते २०१३

१) सेनापती बापट विद्यालय माले, पुणे येथील पाच मुलांचा शिक्षण खर्च रु.५,०००/-

२) प्रसाद धनंजय बापट,खडपोली ता. चिपळूण याला शैक्षणिक सहाय्य रु.५,०००/-

३) श्री.अशोक भिडे,पुणे वैद्यकीय सहाय्य रु.१०,०००/-

४) श्री. अरविंद देसाई सासोली,जि.सिंधुदुर्ग-वैद्यकीय उपचारासाठी सहाय्य रु.१०,०००/-

५) रांझे येथील वृद्धाश्रमास धान्यरूप देणगी रु.१२,०००/-

६) कु.अक्षता धुमाळ हिला MS-CIT साठी मदत रु.३,०००/-

७) प्रणव बापट,बिरवाडी,ता.महाड याला BCA ची फी भरण्यासाठी मदत रु.२०,०००/-

८) सेनापती बापट विद्यालय माले,पुणे येथील ५ मुलांचा वर्षाचा शिक्षणाचा खर्च रु.५,०००/-

९) कु. सारिका बाळू शेटे MSC बायोकेमिस्ट्री फी भरण्यास कमी पडणारे पैसे रु.८,०००/-

१०) कु. गणेश्वरी सुभाष कोकरे व कु. कविता सुभाष कोकरे अनु. १०वी व १२वी रा. धनकवडी या दोन भगिनींना शिक्षणासाठी मदत रु.५,०००/-

११) प्रसाद धनंजय बापट,खडपोली,चिपळूण रु.५०००/-

२०१४ ते २०१५

१) श्रीमती मालती प्रभाकर बापट,मालगुंड रु.५,०००/-

२) कु.सुजाता कातकडे मेंदूच्या आजारासाठी रु.१०,०००/-

३) कु. मंजिरी जितेंद्र वीरकर,चिपळूण नेत्रोपचारासाठी रु.१०,०००/-

४) अनंत रा.हरिदास आकेरी,कुडाळ,सिंधुदुर्ग रु.१०,०००/-

५) जीवन ज्योती मंडळ, मतिमंदांसाठी काम करणाऱ्या संस्थेला १० गरम पाण्याच्या पिशव्या दिल्या.

२०१५ ते २०१६

१) साहिल भागवत रत्नागिरी MSC पर्यावरण रु.१५,०००/-

२) पराग पेंढारकर,कोर्ले देवगड Sy B.com व C.A. एन्ट्रन्ससाठी रु.१५,०००/-

३) शंतनू नारनवरे,पुणे BCA साठी रु.१५,०००/-

४) रामदास तेजम,पुणे ज्यु.कॉलेज शिक्षण रु.१५,०००/-

५) सिद्धी पाटील, आयशाबी मुजावर व विनायक कुमठेकर,भगवान परशुराम इंजि.कॉलेज वेळणेश्वर ता. गुहागर यांना इंजि. शिक्षणासाठी प्रत्येकी रु.५,०००/-

६) सेनापती बापट विद्यालय माले, पुणे येथील ५ विद्यार्थ्यांना रु.५,०००/-

२०१६ ते २०१७

१) श्री.उदय शांताराम महाडिक मालघर ता. चिपळूण यास जीवघेण्या अपघातानंतर वृद्ध आई,पत्नी व ३ लहान मुलांसह आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी मदत रु.३०,०००/-

या शिवाय बापट ट्रस्टतर्फे रक्तदान शिबीर, गरजूंसाठी आरोग्य शिबीर या प्रकारचे अनेक उपक्रम राबविण्यात येतात आणि दर दोन वर्षांनी बापट कुटुंबियांचा स्नेहमेळावा होतो.

स्मरणिका जाहिरातींसाठीचे निवेदन

सर्व बापट बंधू-भगिनी आणि माहेरवाशीणींना आता हे माहित झाले आहे की, बापट कुलसंमेलन यंदा कोकणामध्ये खडपोली ता. चिपळूण येथे दिनांक २४ ते २५ नोव्हेंबर २०१८ दरम्यान होणार आहे. संमेलनाच्या नियोजनाची तयारी बापट मंडळ चिपळूण कडून बापट परिवार चॅरीटेबल ट्रस्टच्या सहकार्याने चालू आहे. याच संमेलनादरम्यान आपणा सर्वांच्या सहकार्याने एक अतिशय सुंदर आकर्षक आणि संग्राह्य अशी स्मरणिका काढण्याचे संयोजन समितीने निश्चित केले आहे. ही सुंदर स्मरणिका प्रा.विनय बापट (गोवा) यांच्या संपादनाखाली करण्यात येणार असून स्मरणिकेसाठी जाहिरातींचाही त्यात अर्थातच अंतर्भाव करणेत येणार आहे.या जाहिरातींमुळे आपला व्यवसाय,त्याचे स्वरूप,उद्योग-धंदा संदर्भातील माहिती सर्वांना देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आपल्या व्यवसाय-उद्योगाची जाहिरात स्मरणिकेमध्ये देऊन स्मरणिकेची शोभा वृद्धिंगत करावी असे संमेलन संजोजन समितीमार्फत आग्रहाचे आवाहन करणेत येत आहे.तसेच स्मरणिकेच्या अर्थकारणास हातभार लावावा अशीही विनंती आहे. जाहिरातींचे दरपत्रक सोबत देत आहोत.

जाहिरातींचे दपत्रक

१. मुखपृष्ठाच्या आतील पान (कलर) A4 पान संपूर्ण रु. १५०००/-

२. मलपृष्ठ (कलर) A4 पान संपूर्ण रु. १५०००/-

३. मलपृष्ठाच्या आतील पान (कलर) A4 पान संपूर्ण रु. १५०००/-

४. आतील पान (कलर) A4 पान संपूर्ण रु. १००००/-

५. आतील १/२ पान (कलर) A4 पानाच्या १/२ पान रु. ६०००/-

६. आतील कृष्ण-धवल पान A4 पान संपूर्ण रु. ३०००/-

७. आतील कृष्ण-धवल १/२ पान A4 पानाच्या १/२ पान रु. १६००/-

८. आतील कृष्ण-धवल १/४ पान A4 पानाच्या १/४ पान रु. ८००/-

९. आतील कृष्ण-धवल १/६ पान A4 पानाच्या १/६ पान रु. ५००/-

संपर्क:- आनंद (नंदू) जनार्दन बापट. ४१९/अ शिवाजी चौक,चिंचनाका चिपळूण ४१५६०५ भ्रमणध्वनी :- ९०१११९७५८३