सासर - माहेर

बापट मी माहेरची आले माहेरी मेळ्यात

माहेरच्या आठवणी दाटल्या दोन डोळ्यात

हरपले छत्र मातापित्यांचे खूप काळ मागे सरला

दोन भाऊ भावजयांनी कधी जाणवू नाही दिला

एकाच गावी आहे माझे माहेर नि आजोळ

जातो झरझर डोळ्यापुढूनी तो बालपणीचा काळ

आज माहेरच्या गावी आहे बापट संमेलन

भेटती एकमेकांना दूरदूरचे आप्तजन

अशा कुलसंमेलनी योग तुम्हा आम्हा भेटीचा

कृपाहास्त सर्वांवर राहो व्याडेश्वर दुर्गेचा

सौ. अनघा दामले

पूर्वाश्रमीच्या : विमल बापट

पुणे

अपलोड केल्याची तारीख : २ ऑक्टोबर २०१२

स्नेहबंध २००९ च्या अंकात प्रसिद्ध