आम्ही सारे बापट

आम्ही सारे बापट, आम्ही सारे बापट

होऊ आम्ही बळकट, होऊ आम्ही दणकट

इच्छा आमुची देशसेवेची

इच्छा आमुची परोपकाराची

इच्छा आमुची लढण्याची

न्यायाची अन् बलिदानाची

आज आम्ही करितो प्रकट ll१ll

दोडी लागता आध्यात्माची

पुण्यशील त्या के भिंची

अन् त्यांच्या उपदेशाची

पावन झाली जनता चिपळूणची

म्हणून आमुचे प्रेम तयांवर उत्कट ll२ll

साथ लाभता थोर शूर सेनापतींची

मुक्त झाली भूमी मुळशीची

मिळे कसण्यास जमीन हक्काची

तहान भूक भागली जनतेची

परी लढा तयांचा नाही गेला फुकट ll३ll

थोर परंपरा ती स्वातंत्रवीरांची

विरश्रीयुक्त पुण्य जीवनाची

नसे भीती कोणत्याही कष्टांची

खाऊ आम्ही भाकरी मेह्नितीची

परी नाही कधी करणार आम्ही कपट ll४ll

चालू आता वाट उन्नतीची

देऊया ग्वाही निष्कलंक चारित्र्याची

मार्गक्रमणा असे जरी परिश्रमाची

जपूया नाती आपण विश्वबंधुत्वाची

दाखवू येथेची आपली ताकद खरी ll५ll

आतुरता आम्हास आहे न्यानार्जनाची

आस लागली आम्हा आमुच्या प्रगतीची

आठव ठेऊ गतादिवसांची अन् पूर्वजांची

उंच वाढवू कमान या भारताची

काळाच्याही खुणा करू पुसट आम्ही ll६ll

मंगेश दत्तात्रय बापट

चिपळूण

मोबाईल : ९४२२०५३४२२

अपलोड केल्याची तारीख : २ ऑक्टोबर २०१२

स्नेहबंध २००९ च्या अंकात प्रसिद्ध