नमस्कार,
बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सर्व बापट कुटुंबीयांना सस्नेह प्रणाम...
चित्पावन ब्राह्मण समाजात कुलवृत्तांत संकलन ही एक जपलेली परंपरा आहे. आज देशातच नव्हे तर जगभरातही ही परंपरा जपणारे अत्यल्प उरले आहेत. आपल्या कुळानेही कै. सदानंद बापट यांच्या मार्गदर्शनाखाली २००९ साली कुलवृत्तांत प्रकाशित केला होता. त्या प्रकाशनाला आता पंधरा वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. या काळात कुटुंबांची रचना, माहिती व तपशील यात मोठे बदल झाले असतील, हे स्वाभाविकच.
कुलवृत्तांत तयार करणे हे परिश्रम, चिकाटी आणि संयम यांची मोठी कसोटी असते. तरीसुद्धा, आपणा सर्वांच्या पाठबळावर पुन्हा एकदा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याचा ट्रस्टने निर्णय घेतला आहे.
ट्रस्टच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुणे येथील श्री. सुरेंद्र श्रीपाद बापट (पुणे) यांनी या संपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यांच्या सोबत ट्रस्टचे विश्वस्त — श्री. अतुल बापट (मुंबई - Mob: 9821411977) आणि श्री. श्रीकांत भाऊ बापट (चिपळूण - Mob: 9421232501)— हे दोघेही अविरत सहकार्य करत आहेत.
या वेबपेजच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची माहिती नव्या कुलवृत्तांतात कशी पाठवायची, याविषयी मार्गदर्शन सादर करीत आहोत. कृपया ही माहिती नीट वाचून तदनुसार कार्यवाही करावी. कोणतीही शंका असल्यास कुलवृत्तांताचे माहिती संकलन प्रमुख असलेल्या दोन्ही विश्वस्तांशी निःसंकोच संपर्क साधावा.
कृपया हे पृष्ठ शक्य तितक्या बापट कुटुंबीयांपर्यंत पोहोचवावे, जेणेकरून २०२७ च्या उत्तरार्धात प्रसिद्ध होणाऱ्या नव्या कुलवृत्तांतात अधिकाधिक कुटुंबांची माहिती समाविष्ट करता येईल.
आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
माहिती संकलानासाठीचे फॉर्म्स
जर आपणास दोन्ही फॉर्म्स भरायचे असतील तर ते कृपया एकदम भरावेत ही विनंती...
बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सर्व बापट परिवार सदस्यांना हा फॉर्म भरावा अशी विनंती करण्यात येत आहे. या माध्यमातून ट्रस्टला सर्व सदस्यांची योग्य संपर्क माहिती आणि अद्ययावत वैयक्तिक व कौटुंबिक माहिती गोळा करण्यात मदत होईल.
कुलवृत्तांत २००८ मध्ये ज्यांच्या मागील पिढीची माहिती उपलब्ध नाही अशा सर्व बापट परिवार सदस्यांना खालील फॉर्म भरण्याची विनंती आहे.