बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे मुखपत्र : हितगुज

ट्रस्टचे मुखपत्र : हितगुज

नमस्कार, समाजात एकोपा रहावा यासाठी समाजातल्या घटकांमध्ये संपर्क व संभाषण असणे अत्यंत गरजेचे असते आणि ह्याच उद्दिष्टाने बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट गेली अनेक वर्षे सतत कार्यरत आहे. सांगण्यास आनंद वाटतो की, आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वासामुळे, बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, गेले एक दशक निरनिराळ्या उपक्रमातून, हे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे.

याच प्रयत्नातले अजून एक पाऊल म्हणून, अनेक दिवसांपासून बापट परिवाराचे एक मासिक असावे असा मानस होता... पण काही कारणांमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. आता बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे नवे विश्वस्त श्री. सुधीर बापट यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे. या उपक्रमांतर्गत आपण प्रत्येक महिन्यात संपूर्ण विश्वातल्या बापट कुटुंबीयांमध्ये होणाऱ्या घाडामोडी टिपणार आहोत.

हे कार्य सुद्धा लोकसहभागाशिवाय पूर्ण करणे अशक्य आहे त्यामुळे या माध्यमातून बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट आपणा सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्यापैकी ज्यांना या कार्यात योगदान देण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर संस्थेचे विश्वस्त श्री सुधीर बापट (मोबाईल : 9890065385) यांच्याशी संपर्क साधावा.

आपल्या कुटुंबात होणाऱ्या घडामोडी, ज्या संपूर्ण बापट परिवाराने जाणून घेतल्या पाहिजेत, असे आपणास वाटते, त्या सर्व घाडामोडींची सखोल माहिती, आपण कृपया आमच्यापर्यंत पोहोचवावी. ह्या मासिक अंकात आम्ही जन्म वार्ता, खास लक्षवेधी उपलब्धी, परीक्षांमधले यश, जे कुटुंबीय आपल्याला सोडून गेले त्यांचा स्मृतिगंध असे अनेक विषय हाताळणार आहोत.

हे वार्तापत्र आणि संस्थेच्या इतर उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण बापट परिवाराची एक मेलिंग लिस्ट आम्ही बनवत आहोत आणि यासाठी खाली दिलेल्या फॉर्ममध्ये आपण कृपया आपले संपूर्ण नाव आणि ई-मेल अड्रेस आम्हाला कळवावा ही आपल्याला विनंती आपणा सर्वांचे आशीर्वाद या नवीन कार्याच्या पाठीशी असतील अशी आशा आम्ही बाळगतो धन्यवाद...

अध्यक्ष, बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट

हितगुज समिती

अध्यक्ष बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट : प्रकाशक

श्री सुधीर बापट : संपादक : मोबाईल क्रमांक - 9890065385

श्री दीपक बापट : वार्ताहर : मोबाईल क्रमांक - 9822653276

श्री शरद बापट : वार्ताहर : मोबाईल क्रमांक - 8007593900