कार्यप्रणाली

बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे वार्तापत्र व त्याच्याशी निगडित निरनिराळे पदाधिकारी यांनी खालील नियमावलीचे पालन करावे, ही विनंती. जेणेकरून ह्या वार्तापत्राचे निर्मिती संपादन आणि प्रकाशन या सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडू शकतील. या नियमांमध्ये वेळोवेळी गरजेनुसार बदल करण्यात येतील त्यामुळे संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की त्यांनी हे वेबपेज सतत चेक करावे.

  • प्रकाशक
    • बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हे या वार्तापत्राचे पदसिद्ध प्रकाशक असतील.
    • प्रत्येक अंकात प्रकाशित होणाऱ्या सर्व बाबींसाठी लेखक जबाबदार असेल.
    • प्रत्येक अंकात काय प्रकाशित व्हावे आणि काय होऊ नये यासंबंधीचे सर्व अधिकार हे प्रकाशकाच्या स्वाधीन असतील.
  • संपादक
    • संपादकाची नेमणूक ही त्यांना पदावर पाचारण केल्यापासून पाच वर्षांसाठी किंवा प्रकाशक सुचवेल तोपर्यंत असेल.
    • संपादकाची भूमिका प्रमुख्याने समन्वयकाची असेल संपादकाने सर्व वार्ता संकलन करणाऱ्यांशी समन्वय राखणे अत्यावश्यक आहे.
    • संपादकाने वार्ता संकलन करणाऱ्यांच्या सतत संपर्कात राहणे आवश्यक असून त्यांच्या गरजा व शंकांचे निवारण करणे गरजेचे आहे.
    • संपादकांनी संकलनाचे कार्य व्यवस्थित पार पडावे यासाठी स्वतःची अशी कार्यप्रणाली आखून ती अमलात आणणे गरजेचे आहे.
    • संपादकाने संकलित झालेल्या सर्व माहितीचे संपादन करून त्याचे लेआउट आणि आर्टवर्क तयार करून प्रत्येक अंक तयार करणे गरजेचे आहे.
    • तयार झालेला प्रत्येक ड्राफ्ट प्रकाशनापूर्वीच संपादकाने प्रकाशकाकडे त्याच्या संमतीसाठी पाठवणे अनिवार्य आहे.
    • प्रकाशकाच्या संमती पश्चात संपादकाने तयार झालेली पीडीएफ फाईल वेबसाईट च्या समन्वयकाकडे सुपूर्द करावी.
    • ह्या पदावर कार्यरत राहण्यासाठी कोणतेही मानधन अथवा कोणत्याही प्रकारचा भत्ता देण्यात येणार नाही.
  • वार्ताहर
    • वार्ताहराची नेमणूक ही त्यांना पदावर पाचारण केल्यापासून एक वर्षासाठी किंवा संपादक सुचवेल तोपर्यंत असेल.
    • वार्ताहर यांची प्रमुख भूमिका हि बापट कुटुंबीयांमध्ये चालू असलेल्या निरनिराळ्या घडामोडी च्या संपर्कात राहणे व त्यांची माहिती संकलित करत राहण्याची असेल.
    • वार्ताहरांनी उपलब्ध अशा सर्व माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त माहिती ही संपादकांकडे ई-मेलच्या माध्यमातून पाठवणे अनिवार्य आहे.
    • प्रत्येक बातमी चे स्वरूप हे कमीत कमी शंभर किंवा जास्तीत जास्त दोनशे मराठी शब्द आणि कमीत कमी दोन फोटोग्राफ असेल.
    • ह्या वार्तापत्राची भाषा मराठी असल्यामुळे सर्व वार्ता ह्या मराठी भाषेत युनिकोडमध्ये टाईप करून वार्ताहराने संपादकांकडे पाठवाव्या.
    • संपादक सूचित करतील त्याप्रमाणे योग्य वेळी योग्य ती कार्यवाही करणे हे वार्ता संकलकांचे प्रामुख्याने कार्य असेल.
    • ह्या पदावर कार्यरत राहण्यासाठी कोणतेही मानधन अथवा कोणत्याही प्रकारचा भत्ता देण्यात येणार नाही.