बापट कुलसम्मेलन (नोव्हेंबर २०२४)
केळ्ये - रत्नागिरी
सप्रेम नमस्कार,
२५ फेब्रुवारी २००८ रोजी आपला "बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट" स्थापन झाला. त्याला सन २०२३ मध्ये १५ वर्ष पूर्णझाली. या काळात ट्रस्ट ने अनेक समाजोपयोगी कामे केली. अनेक गरजू विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना मदत केली. गुहागर, सांगली तसेच चिपळूण येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी रोख तसेच वस्तूरूपाने मदत केली. अर्थात आपण वेळोवेळी दिलेल्या भरघोस देणग्यांमुळेच हे शक्य झाले. ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अनेक कुटुंबे जोडली गेली. ट्रस्ट साठी असलेले हे प्रेम, ही आस्था अशीच राहो ही विनंती.
आपली भेट मागील पुणे येथे संपन्न झालेल्या १०व्या कुल संमेलनात झाली होती. भेटीगाठींचा योग पुन्हा एकदा आपल्या ११ व्या कुलसंमेलनाच्या निमित्ताने येणार आहे.
कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपले ११ वे "बापट कुलसंमेलन" शनिवार दिनांक २३ आणि रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ असे दोन दिवस केळये, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.
तरी सर्व बापट सदस्य आणि कुटुंबियांना संमेलनासाठी उपस्थित राहण्याचे हे आग्रहाचे निमंत्रण. आपण नेहेमीच बापटांच्या माहेरवाशिणीना कुलसंमेलनात सहकुटुंब सहभागी करून घेतो. या पत्राद्वारे त्यांनाही सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. सर्वांनी कुल संमेलनाला आपला कुळाचार समजून अवश्य उपस्थित रहावे. दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम कार्यक्रम असलेले असे हे कुलसंमेलन आपल्या उपस्थिती मुळे यशस्वीपणे पार पडणार आहे. तरी संमेलनाला उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा.
घरातील जास्तीत जास्त सदस्यांना उपस्थित राहता यावे म्हणून संमेलन शुल्क माफक म्हणजे प्रत्येकी ₹ ५००/- (रु. पाचशे मात्र - २३ आणि २४च्या रहाण्या जेवण्या सकट) इतके ठेवण्यात आले आहे. दिलेल्या या (https://rzp.io/l/kulasammelan) फॉर्ममध्ये पहिल्या फिल्डमध्ये आपल्याला हव्या असलेल्या एकूण तिकिटांचा आकडा सिलेक्ट करावा. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला आपल्या ई-मेल अड्रेस वर पावती मिळेल ही पावती दाखवून आपण संमेलनाच्या दिवशी सकाळी छापील सन्मानिका मिळवू शकाल.
संमेलनाचे स्थळ
श्रीरामकृष्ण आनंदवन रिसॉर्ट
केळ्ये (अम्बेकंद) येथे, माझगाव, ता. जिल्हा. रत्नागिरी, महाराष्ट्र पिन कोड नं .1515612 :: मोबाईल : 98200 23106
वेब साईट : https://shreeramkrishnatravels.com/anandvan/anandvan.html