जिल्हावार प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी निकष
बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टसाठी जिल्हावार प्रतिनिधीनियुक्त करण्यासाठीचे प्रोटोकॉल आणि कर्तव्ये
१. व्यक्ती कोणत्याही वयोगटातील स्त्री किंवा पुरुष असू शकते. शक्यतो तो पीसी, स्मार्टफोन आणि इंटरनेटसह संभाषणकलेत पारंगत असावा. नेट कनेक्शनसह स्वत: चा पीसी असल्यास उत्तम. अमर्याद कॉलिंग सेवा असणारा फोन आवश्यक.
२. स्वतःची दोन / चार चाकी गाडी असावी.
३. बापटांशी संपर्क करण्याच्या कामासाठी रोज थोडा वेळ देणे भाग आहे.
४. ट्रस्ट व्यक्तीकडे सुधारित सॉफ्ट पीडीएफ कॉपी किंवा बापट संपर्क सेतूची हार्ड कॉपी व्यक्तीस पाठवेल. व्यक्ती त्यातील लोकाना शोधून संपर्क साधून यादीत न सापडतील आणि नवीन तपशील ट्रस्ट ऑफिसकडे पाठवेल.
५. सध्या जन्मतारीख, रक्त गट, सध्याच्या बापट व नवीन बापटांचा व्यवसाय तपशील याविषयी माहिती गोळा करायचा आहे. यामुळे बापटांच्या व्यवसायाचा प्रचार करण्यात मदत होईल. शुभेच्छा पाठवण्यासाठी जन्मदिनांक उपयोगी ठरतील.
६. स्थानिक बापट मंडळीना एकत्र करून त्यांच्या आर्थिक आणि इतर सर्व सहभागातून स्थानिक पातळीवर अनौपचारिक स्नेहसंमेलन आयोजित करावी लागतील.
७. स्थानिक पातळीवर घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींबद्दल ट्रस्ट ऑफिसला अपडेटेड ठेवणे.
८. स्थानिक बापट मंडळीना, ट्रस्टकडून माहिती घेऊन, ट्रस्टच्या कार्याची माहिती देत राहणे. आणि त्यांना त्या कार्यात सहभागी करून घेणे तसेच डोनेशन द्यायला प्रोत्साहन देणे.
९. स्थानिक लोकांच्या सूचना / नवीन कल्पना / उपक्रम ट्रस्टला कळवणे.
१०. या श्रमदानासाठी जिल्हा प्रतिनिधीला कोणतेही मानधन दिले जाणार नाही, हे एक समाजकार्य आहे.