कु. मंजिरी वीरकर हिला सहाय्य

कु. मंजिरी वीरकर हिच्या उपचारांसाठी बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे आर्थिक सहाय्य !!!!!!

चिपळूण: चिपळूण मधील रिक्षा व्यावसायिक श्री. जितेंद्र वीरकर यांची दीड वर्षाची मुलगी कु. मंजिरी वीरकर हिच्या डोळ्यांमध्ये उद्भवलेल्या ट्युमरच्या शस्त्रक्रियेसाठी बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे आणि यांच्यातर्फे रुपये १०,०००/- ( दहा हजार ) आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. या रकमेचा धनादेश नुकताच स्वागत लॉज येथे श्री. जितेंद्र वीरकर यांना श्री. जयंतशेठ बापट व श्री माधवराव बापट यांचे हस्ते आणि श्री. श्रीकांत बापट , श्री. मंगेश बापट , श्री. विलास बापट , श्री. प्रमोद बापट , श्री. अनिकेत बापट ,कु . आदित्य बापट यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला. श्री. जितेंद्र वीरकर यांना यावेळी कु. मंजिरीचा आजार लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून सर्वांनी त्यांना धीर देऊन शुभेच्छा दिल्या. कु. मंजिरी वीरकर हिच्या डोळ्यातील ट्युमरची अवघड शस्त्रक्रिया खूप खर्चिक आणि हैद्राबाद येथे करावी लागणार असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांचे स्नेही श्री. दिलीप नामजोशी यांनी बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या निदर्शनास आणून दिल्यावर ट्रस्टतर्फे त्यांना तातडीने रुपये १०,०००/- ( दहा हजार ) आर्थिक सहाय्य सर्वानुमते देण्यात आले. याचवेळी या आवाहनास प्रतिसाद देत कै. रविंद्र बापट यांच्या पत्नी , श्रीमती. रेखा बापट यांनी वैयक्तिक रुपये ५,०००/- ( पाच हजार ) ची मदत श्री. जितेंद्र वीरकर यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच चिपळूणमधील श्री. माधवराव यशवंत बापट यांनीही रुपये ५००/- ( पाचशे ) वैयक्तिक मदत त्यांचेकडे सुपूर्द केली. याचवेळी श्री. जितेंद्र वीरकर आणि त्यांचे सर्व रिक्षा व्यावसायिक सहकारी श्री. रवींद्र घाडगे, श्री. सुरेश तटकरे, श्री. संतोष रहाटे, श्री. मनोहर केतकर, श्री. सचिन झगडे, श्री. संतोष साळवी, यांनी सर्व बापट बंधू आणि बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे या बहुमुल्य मदतीकरिता आभार मानले .

मंगेश दत्तात्रय बापट, चिपळूण

मोबाईल : ९४२२०५३४२२

अपलोड केल्याची तारीख : १८ मार्च २०१५